News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - महसुल दिनाचे निमीत्ताने 1 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आयोजीत कार्यक्रमात सिंदेवाही तहसिल कार्यालयातील तहसिलदार गणेश जगदाळे यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत जिल्हाधिकारी मा. अजय गुल्हाने साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
तहसीलदार गणेश जगदाळे यांनी सिंदेवाही तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून महसूल विभागात उत्तम कामगिरी व उत्कृष्ट असे उल्लखनीय कार्य केल्याबद्दल तसेच सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांचे तहसील कार्यालयातील कामांसाठी तहसीलदार गणेश जगदाळे हे जातीने लक्ष देत सहकार्य करत असतात. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत चंद्रपूर चे जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाने साहेब यांनी महसूल दिनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला आहे.