News 34 chandrapur
चंद्रपूर : सेना भर्ती कार्यालय, नागपूरमार्फत राज्य राखीव पोलीस दल, गट 4, नागपूर येथे दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. Indian army
या भरती मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्जासह, नोंदणीसाठी लॉगइन कालावधी 3 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे वेबसाइटवरून 10 ऑगस्ट 2022 पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. भरती मेळाव्याचा संक्षिप्त तपशील भारतीय सैन्याच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या आगामी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक कर्नल हिम्मत सिंह ढिल्लो यांनी केले आहे.