News 34 chandrapur
चंद्रपूर - जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील जीवन अस्तव्यस्त झाले होते, जिल्ह्यातील ग्रामीण भागासह यंदा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते, हजारो नागरिकांचे बचाव कार्य करण्यात आले होते.flood alertजुलै महिन्यात पावसाने जणू कहरच केला होता, त्यांनतर 15 दिवस पावसाने विश्रांती घेतली मात्र जुलै महिन्यापेक्षा ही जास्त पाऊस ऑगस्ट महिन्यात पडायला सुरुवात झाली. Heavy rainfall
नदी, नाले तुडुंब भरल्याने नदीकाठी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे, चंद्रपूर मनपाने याबाबत अतिसावधनतेचा इशारा नागरिकांना दिला आहे, विशेष म्हणजे या इशाऱ्यात जुलै महिन्यात आलेल्या पुरापेक्षा ही जास्त असणार आहे. Chandrapur flood
मागील 2 दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे, इराई धरण, अप्पर वर्धा धरनातील पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे, आधीच शहरातील रहमतनगर व सिस्टर कॉलोनी भागात अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. Irai dam
नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे व मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दूरध्वनी - 101, 07172-259406, 9823107101, 8975994277, 07172-254614 व सम्पर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
