News 34 chandrapur
चंद्रपूर - टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची कला आजही अनेकजण जोपासत आहे, मात्र बांबू पासून विविध वस्तू तयार करीत चंद्रपूरच्या मीनाक्षी मुकेश वाळके यांनी जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Bamboo rakhi
चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात वर्ष 2019 ला प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मीनाक्षी वाळके यांनी बांबू पासून विविध वस्तू तयार करीत नवनवीन प्रयोग केले. Raksha bandhan 2022
बांबू पासून त्यांनी विविध डिझाइन च्या राख्या तयार केल्या हळूहळू बांबू पासून बनलेल्या राख्याना जिल्ह्यात, देशात व नंतर जगात मागणी वाढली.
मीनाक्षी वाळके यांनी बनविलेल्या राख्याना स्वीडन, अमेरिका, लंडनला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. Rakhi
त्यांना राज्य व देश स्तरावर अनेक पुरस्कार ही मिळाले आहे, मात्र बांबू पासून सदर वस्तू निर्मिती करण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते, त्या सर्व समस्यांवर मात करीत एक नवा अध्याय सुरू केला.
त्यांच्या या कामात पती मुकेश वाळके यांचाही मोठा वाटा आहे.
देशात महागाई वाढली, राखी बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूच्या किमती वाढल्या मात्र मीनाक्षी द्वारे बनविल्या गेल्या राख्यांची किंमत मात्र वाढली नाही.
आज बांबू ने बनलेल्या राख्या सर्वांच्या पसंतीला पडत आहे.
विशेष म्हणजे मीनाक्षी यांच्या बांबू पासून बनलेल्या वस्तूच्या कामात अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
