News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहराजवळील देवाडा या गावात सुधाकर डाहूले यांनी पत्नी स्नेहा डाहूले यांचा गळा आवळून खून करीत स्वतः विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.सदर घटनेने देवाडा या गावी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, इलेक्ट्रिक चा व्यवसाय करणाऱ्या सुधाकर ला छंद होता तो online betting या खेळाचा, सुधाकर चा हा छंद त्याला व्यसनाधीन बनवून गेला, दिवस रात्र online rummy जुगार खेळत बसायचा.
या खेळात सुधाकर यांच्यावर लाखोंचे कर्ज झाले, कर्जपायी सतत कौटुंबिक वाद व्हायला लागले होते.
कर्ज वाढत असल्याने मोठ्या भावाने कर्जाचे काही पैसे देत सुधाकर चे ओझे कमी केले मात्र त्याच व्यसन काही सुटेना. Chandrapur Crime
स्नेहा डाहूले यांनी सुधाकर चं व्यसन सुटावे यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
इलेक्ट्रिक च्या व्यवसायातून जी कमाई व्हायची ती सर्व ऑनलाइन rummy मध्ये घालवायचा यामुळे घरात अनेक वाद झाले.
मात्र सोमवारी कौटुंबिक वाद विकोपाला गेला या वादात सुधाकर ने पत्नी स्नेहा चा गळा आवळून खून केला, त्यानंतर मोठ्या भावाशी सम्पर्क साधत मी पत्नीला मारले व आता स्वतः आत्महत्या करीत आहे असे म्हटले. Mobile data
महाकाली नगरी परिसरात असणाऱ्या विहिरीत सुधाकर ने उडी घेत आत्महत्या केली.
सुधाकर यांनी कर्जपायी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता, ऑनलाइन जुगारापायी सुधाकर यांचेवर तब्बल 20 लाखांचे कर्ज झाले होते.
सुधाकर व स्नेहाच्या पश्चात त्यांना 2 मुली आहे, त्यांचं काय होणार? याचा जराही विचार सुधाकरने केला नाही.
सध्या देशात डेटा मोफत झाल्याने अनेक युवक व वयस्कर नागरिकांना online game चा नाद लागला आहे, यातच आता online rummy ने तर घरी बसल्या पैसे कमवा अशी लालूच देण्याचे काम सुरू केले आहे, पैश्याच्या लालसेपोटी अनेक नागरिक कर्जबाजारी झाले, विशेष म्हणजे देशात ऑनलाइन जुगारावर प्रतिबंध आहे, त्यानंतरही असे खेळ सर्रासपणे सुरू आहे.
खासदार बाळू धानोरकर यांनी ऑनलाइन जुगार बंद करण्याची लोकसभेत केली मागणी
युवा पिढी मोठ्या प्रमाणात कमी वेळात जास्त पैसे कमविण्याच्या नादात ऑनलाईन जुगार खेळत आहेत. यामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यासोबतच अश्लील साहित्य हि पिढी मोठ्या प्रमाणात बघत असल्याने भविष्य अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर केंद्र सरकारने त्वरीत प्रतिबंध घालावा अशी मागणी खा. बाळु धानोरकर यांनी लोकसभेत नियम 377 अन्वये केली.
obscene material
देशातील युवा पिढी बेरोजगारीने होरपळलेली आहे. मात्र ऑनलाईन उपलब्ध असलेली मटका बुकींग, एम.बी.किंग, गामा बट्स, रेडीना नावाने जुगार उपलब्ध असुन यात युवा पिढी प्रचंड संख्येने लुटल्या जात आहे. त्याबरोबरच सद्यास्थितीतील विद्यार्थी वर्गात ऑनलाईन वापर मोठया प्रमाणात होत असुन सहजतेने ऑनलाईनवर उपलब्ध असलेले अश्लील साहित्य व व्हिडीओ या सगळयांवर त्वरीत प्रतिबंध घालुन युवा पिढीचे आयुष्य बरबाद होण्यापासुन सरकार ने वाचवावे, अशी मागणी खासदार बाळु धानोरकर यांनी लोकसभेत केली. Satta