News 34 chandrapur
चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांच्या बंडानंतर शिंदे गट व भाजपने हातमिळवणी करीत राज्यात सरकार स्थापन केली.मात्र सर्वोच्च न्यायालयात बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. Shinde-bjp
मागील महिन्याभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार 9 ऑगस्ट ला होणार असून त्यामध्ये चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. Sudhir mungantiwar
5 वेळा आमदार, पर्यटन मंत्री ते राज्याचे अर्थ व वनमंत्री राहिलेले मुनगंटीवार पुन्हा मंत्री बनणार आहे.
अनेक विभागातील दांडगा अनुभव आमदार मुनगंटीवार यांना आहे. Cabinet expansion
आमदार मुनगंटीवार यांना महसूल किंवा वित्त विभागाची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे.