News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल- : सद्या स्थितीत शेताकडे रानटी डुकराचे हैदोस वाढले असल्याने शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नाचे राखण करण्यासाठी दिवस असो की,रात्र नेहमीच जाऊन पाहणी करावी लागत आहे.
Wild animals एकीकडे रानटी डुकराचा बंदोबस्त वनाधिकारी आणि वनविभाग करीत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होऊन बसले आहे. शेतकऱ्यांना शेती केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने अन्यथा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उपाशी राहण्याची पाळी आहे. तरी देखील शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत केंद्र अशी वा राज्य शासन गंभीर नाही. Wild boar attack अधिवेशनामध्ये कुठलाही निर्णय घेतांना दिसत नाही. अशी टीकाही शेतकरी बांधवांनी शासन कर्त्यावर केली आहे. दिनांक २७/८/२०२२ रोजी सायंकाळी ४-३० वाजता भेजगाव येथील महिला सुनंदा नामदेव लेंनगुरे वय (५४) ही आपल्या शेतामध्ये काम करीत असताना रानटी डुकराने हल्ला करुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना ऐन तान्हा पोळ्याच्या दिवशीच घडली. याबाबत त्वरित गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे हलविण्यात येऊन उपचार सुरु आहे. सदर महिला विधवा असून तिला दोन मुलं व मोठा परिवार आहे. घटनेची माहिती पोंभूर्ना वनविभागाला ग्रामस्थांनी दिली. असल्याचे सांगण्यात आले. या घटनेच्या आदल्या दिवशीच तालुक्यातील चितेगावं येथे एका युवक शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून तो देखील जिल्हा रुग्णालय चंद्रपूरला उपचार घेत आहे. रानटी डुकराच्या व वाघाच्या हल्यात दिवसेदिवस वाढ होत असल्याने एकसारख्या घटना घडत असताना सुद्धा शासन आणि वनविभाग कायम स्वरुपी उपाययोजना करायला पाहिजे. परंतु शासन कर्ते, व लोक प्रतिनिधी आणि वनविभागाचे अधिकारी हे रोजच्या घटना घडतच आहेत.आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहतच आहेत.ही अवस्था केव्हापर्यंत राहील अशी ग्रामस्थांची हाक आहे. व बोलूनही दाखविले आहे.