News 34 chandrapur
घुग्घूस : येथील अमराई वॉर्डात भूस्खलनात गजानन मडावी यांचे घर हे जमिनीत सत्तर फीट गाडल्या गेले सदर वस्ती खाली ब्रिटिश कालीन भूमिगत कोळसा खाणी होत्या त्यामुळे सदर वस्तीतील नागरिकांना कधी ही धोखा होऊ शकतो हे लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचे पाऊल उचलत सदर वस्तीतील जवळपास 165 घरे जिल्हापरिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले. Landslide ghughus
घटनेची गंभीरता लक्षात घेत क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली व नागरिकांना दुसरीकडे स्थलांतर करीत त्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे याकरिता 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार बाळू धानोरकर, आमदार सौ.प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वेकोली महाप्रबंधक आभाषचंद्र सिंग, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार निलेश गौड,नगरपरिषद मुख्याधिकारी पिदूरकर,पोलीस निरीक्षक बबनराव पुसाटे,काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर,संयुक्त यांच्या बैठकीत नागरिकांना तीन महिन्यात घरपट्टे व घर निर्माण होईपर्यंत वेकोली तर्फे प्रति माह तीन हजार रूपये घरभाडे देण्याचा निर्णय झाला. house rent त्या निर्णया अंतर्गत उद्या 01 सप्टेंबर रोजी नागरिकांना पैशाचे वाटप करण्यात येईल व जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निर्णयाची इतिवृत्त प्रत ही देण्यात येईल अशी माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी पिदूरकर यांनी दिली. Immigrant family याप्रसंगी पोलीस निरीक्षक बबनराव पुसाटे, काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर,देव भंडारी, शाहरुख शेख,अंकुश सपाटे या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.