News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुरातील लालपेठ खुल्या खाणीत युवक बुडाल्याच्या चर्चेने वाऱ्यासारखा वेग धरल्याने वेकोलीच्या अधिकाऱ्यांना खुल्या खाणीत दाखल व्हावे लागले.
31 ऑगस्टला 4 वाजताच्या सुमारास लालपेठ खुल्या खदाणीत साचलेल्या पाण्यात कुणीतरी उडी घेतली हे बघितले असता सदर बाब वाऱ्यासारखी लालपेठ परिसरात पसरली. Big news
कोळसा खदाणीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्या जातो, खदाणीत ज्या ठिकाणी पाणी साचून होते तिथं कुणीतरी उडी घेतली, कुणी म्हटलं एक युवक पोहत होता अश्या चर्चा लालपेठ परिसरात सुरू होत्या. Open cast coal mine
चर्चेच्या आधारावर वेकोलीचे मोठे अधिकारी खदाणीत दाखल झाले, चर्चेत काही सत्यता आहे का याबाबत सध्या पडताळणी सुरू आहे.
जर कुण्या युवकाने तिथे उडी घेत आत्महत्या केली असेल तर वेकोलीच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो कारण तो मार्ग सामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित असतो. Suicide
वृत्त लिहेपर्यंत मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते.