News 34 chandrapur
ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ माजविणाऱ्या वाघाला वनविभागाने जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. Tadoba tigerया नरभक्षक वाघाने आतापर्यंत 3 नागरिकांचा बळी घेतला, पहिली शिकार 28 जून, दुसरी शिकार 16 ऑगस्ट तर तिसरी शिकार 17 ऑगस्टला शेतात काम करीत असलेल्या विलास रंध्ये ला 10 लोकांसमोर या नरभक्षक वाघाने फरफटत नेले होते. Human Wildlife Conflict
वाघाचा आतंक ब्रह्मपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता, तालुक्यातील शेत शिवार परिसरात मानवी वस्तीचा वावर झपाट्याने वाढत असल्याने वाघाचे हल्ले वाढत जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. Maneater tiger
वनविभागाने नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत वाघाला रेस्क्यू करण्याचा निर्णय घेतला.
18 ऑगस्टला ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र मधील भगवानपूर नियतक्षेत्रामध्ये नरभक्षक वाघ भ्रमण करीत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
तात्काळ वनविभागातील अधिकारी व पोलीस विभागातील शूटर ने सकाळी अचूक निशाणा साधत वाघाला डार्ट केले.
वाघ बेशुद्ध झाल्यावर त्याला सुखरूप पणे पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. Tiger attack
सदर वाघ हा नर असून त्याच वय अडीच वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली. Dart
सध्यातरी ब्रह्मपुरी तालुक्यात नरभक्षक वाघाची दहशती पासून नागरिकांना सुटका मिळाली आहे.