News 34 chandrapur
चंद्रपूर - 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले असून आज 76 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहे.चंद्रपुरात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहातील भारतरत्न लता मंगेशकर कला दालनात 3 दिवसीय (15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट) चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
Independence day 2022
Independence day 2022
विशेष म्हणजे ही प्रदर्शनी चंद्रपुरकरांसाठी "मोठं सरप्राईज" आहे, प्रसिद्ध संगीतकार AR RAHMAN यांच्या संगीत व चित्रपटावर आधारित ही प्रदर्शनी असणार आहे. Picture exhibition
Mh34 व Intach द्वारे सदर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली असून PK Arts & Design Studio चे संचालक व चित्रकार प्रवीण कावेरी यांनी तब्बल 7 महिन्यात 20 चित्र काढले आहे.
पण या चित्रामागे मोठे गुपित आहे, ते प्रदर्शनी बघितल्यावर कळणार.
आज 15 ऑगस्टला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. Chandrapur news
आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन Intach चे संयोजक अशोकसिंह ठाकूर, सहसंयोजक प्रवीण निखारे, चित्रकार व MH34 हमारा चांदा व PK Arts चे प्रवीण कावेरी, धीरज कावेरी, आदित्य निकुरे, अनिल खामनकर, प्रीती वर्मा, अन्नपूर्णा बावनकर व स्वाती दुर्गमवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
