News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील राजीव गांधी काॕलेज परिसरात दुर्मिळ पक्षांची शिकार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शिकार केलेले पक्षी हातात घेऊन जात असतांना एका तरूणाचा विडीओ वायरल viral video झाला आहे.या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
वन्यजीवांचा मोठा अधिवास असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शिकारीचे प्रमाण वाढले आहे. rare bird वाघ,तृणभक्षक प्राण्यांचा शिकारीचा अनेक घटना उघळकीस आल्या आहेत.आता मात्र या जिल्ह्यातील पक्षी सूध्दा सूरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.थेट शहरातच पक्षांची शिकार केल्या जात असल्याचा विडीओ समाजमाध्यमात social media वायरल झाला आहे.
शिकार केलेले पक्षी राजरोषपणे हातात घेऊन तरूण जात आहे.त्याचा चेहऱ्यावर कुठलीच भिती नाही. उलट विडीओ काढणार्या तरूणालाच हा शिकारी तरूण घाबरवीत आहे. विडीओ काढणार्याला हा तरूण धमकावित आहे. " फोटो मत निकाल बोला ना तेरे कु..! समज नही आ रहा क्या..! एकबार बताया तो...! " असं बोलत आहे.विडीओ काढणार्याने हा विडीओ वन्यजीवांचा सवर्धनाचा विडा उचललेल्या संस्थेचा अधिकृत व्हाॕटसअप गृपमध्ये टाकलाय.हा विडीओ काढल्याचे त्याने लिहीलं आहे.राजीव गांधी काॕलेजचा अगदी समोर असलेल्या वस्तीकडे हा तरूण गेल्याचे विडीओ टाकणार्याने लिहीलं. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.