News 34 chandrapur
चंद्रपूर - आगामी रक्षाबंधन सणानिमित्त इंदिरा गांधी गार्डन स्कूल, रामनगर येथे शनिवारी 'राखी निर्मिती स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. Rakhi purnima 2022 ही स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. स्पर्धेत एकूण 669 मुला-मुलींनी सहभाग घेतला. भावावरचे प्रेम व्यक्त करत बहिणींनी अनेक सुंदर राख्या बनवल्या. तसेच भावांनीही आकर्षक राख्या बनवून बहिणींबद्दलचे प्रेम व्यक्त केले.
ही स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात घेण्यात आली. पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी एक वर्ग आणि तिसरी आणि चौथी इयत्तेसाठी दुसरा गट होता. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या गटात आणि आठव्या, नवव्या आणि दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना चौथ्या गटात ठेवण्यात आले. आकर्षक राख्या तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. rakhi making ideas with paper
शिक्षिका निशा कैथवास आणि विद्या माथनकर यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक राख्यांचे मूल्यांकन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. rakhi making ideas for school competition
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केला. स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा व पारितोषिकांचे वितरण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. rakhi making activity in school