News 34 chandrapur
घुग्घुस - घुग्घुस येथील विठ्ठल मंदिरात रविवारी, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न झाली.
शिवसेना महिला आघाडीच्या पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख सौ. शिल्पाताई बोडखे यांच्या उपस्थितीत व चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या संघटिका सौ. उज्ज्वलाताई नलगे व वर्षाताई कोठेकर उपस्थित होते. Shivsena mahila aaghadi
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच घुग्घुस शिवसेना महिला आघाडीची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
घुग्घुस शहर शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. संध्याताई जगताप, उपशहर प्रमुख सौ. संगीताताई देवराव बोबडे, सौ. गायत्रीताई नाने यांना पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख सौ. शिल्पाताई बोडखे यांच्या पत्राद्वारे नियुक्तीपत्र देऊन पदावर नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त महिला पदाधीकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Shivsena chandrapur
यावेळी शिवसेना नेते बाळू चिकनकर, उपतालुका प्रमुख गणेश शेंडे, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, माजी शहरप्रमुख बंटी घोरपडे, अजय जोगी, शहंशाह शेख, महिला आघाडीच्या सखुबाई मोहितकर, सुमन बांदूरकर, ताराबाई बोबडे, मनीषा चौधरी, निर्मला खनके, निलीमा हिरादेवे, वंदना बांदूरकर, सविता सोनटक्के, सुलोचना पिंपळकर व मोठया संख्येत महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.