News 34 chandrapur
चंद्रपूर/पडोली - पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा देवाडा येथील महाकाली नगरी मध्ये डाहूले कुटुंबियांत वाद झाल्याने 40 वर्षीय सुधाकर डाहूले यांनी पत्नी सौ. स्नेहा डाहूले चा गळा आवळून खून केला.
पत्नीची हत्या केल्यावर सुधाकर यांनी गजानन महाराज मंदिर येथील मैदानातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. Crime news
घटनेची माहिती मिळताच पडोली पोलोस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सुधाकर डाहूले यांचा मृतदेह अजून मिळाला नाही, आपत्ती व्यवस्थापन यांची चमू सुधाकर यांचा मृतदेह काढण्याचा प्रयत्न करी आहे. Murder mystery
सुधाकर डाहूले हे इलेक्ट्रिशिअन चे काम करीत होता, पती-पत्नीमध्ये नेमका वाद काय झाला याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसून पुढील तपास सुरू आहे.