News 34 chandrapur
राजुरा : दहीहंडी उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर वंचित बहुजन आघाडी व टिपू सुलतान फाऊंडेशनच्या वतीने राजुरा येथे ढोल पथकाच्या कार्यकर्त्यांना शीतपेय वाटप करण्यात आले. असे उपक्रम वास्तविक भारताचे दर्शन घडवतात. आपल्या देशाची ताकद ही फुटीचे राजकारण नसून सर्वसमावेशक राजकारण आहे. हे जाणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल की राजुरा चे असलम भाई चौश दरवर्षी गांधी चौक राजुरा येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात.काही शक्ती धर्माच्या नावाखाली सौहार्द आणि बंधुता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. Dahi handi 2022
अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ने केलेल्या कालच्या उपक्रमांमुळे धार्मिक एकात्मता वाढीस लागते. वंचित बहुजन आघाडी सर्व धर्मांमध्ये एकता निर्माण करत राहील आणि सर्व धर्मांचा आदर राखेल.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदराव अंगलवार जिल्हा महासचिव, रमेश लिंगमपल्लीवार जिल्हा उपाध्यक्ष, सुशील मडावी राजुरा तालुकाध्यक्ष, धनंजय बोर्डे तालुका उपाध्यक्ष, सुभाष हजारे, अभिलाष परचाके यांनी परिश्रम घेतले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी व टिपू सुलतान फाऊंडेशनचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.