News 34 chandrapur
चंद्रपूर - 19 ऑगस्टला चंद्रपूर महानगरपालिका येथे आयुक्त राजेश मोहिते यांच्या कक्षात लातूर जिल्ह्यातील टाकळी गावातील 38 वर्षीय लक्ष्मण राजेंद्र पवार यांनी आयुक्तसमोर स्वतःवर चाकूने वार केले.
अचानक झालेल्या या घटनेमुळे महानगरपालिकेत चांगलीच खळबळ उडाली होती.
मात्र या प्रकरणी अनेक संभ्रम निर्माण झाले आहे, 2 मे 2022 ला लक्ष्मण पवार यांनी स्टॅम्प पेपर द्वारे राजेश मोहिते यांच्याशी माझा काही संबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते.
लक्ष्मण पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, प्राथमिक माहिती मध्ये कुणी कंत्राटदार तर कुणी मनोरुग्ण असल्याचा उल्लेख केला होता, मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळाले आहे. Audio clip viral
लक्ष्मण पवार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील टाकळी या गावातील रहिवासी आहे, त्यांची एक शैक्षणिक संस्था असून त्या माध्यमातून ते गावात आश्रमशाळा चालवितात, वर्ष 2016-17 मध्ये त्यांचे वडील राजेंद्र पवार यांनी मोहिते यांच्याकडे मोठी रक्कम दिली असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
त्यावेळी मोहिते हे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहायक म्हणून काम बघत होते, पवार यांचं काम झाले नाही, आणि पैसेही परत मिळाले नाही असा दावा त्या क्लिप मध्ये केला गेला आहे.
Viral clip
Viral clip
सदर ऑडिओ क्लिप ही 19 एप्रिल 2022 ची असल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यावेळी लक्ष्मण पवार यांची भेट आम आदमी पक्षाचे शहर सचिव राजू कुडे यांचे सोबत झाली होती.
त्यावेळी पवार यांनी आपली आपबीती कुडे यांना सांगितली.
पवार यांनी एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, मात्र तेव्हा ती परवानगी नाकारण्यात आली.
माझे पैसे मला परत मिळाले नाही तर मी आत्मदहन करेल असा इशारा पवार यांनी दिला होता, ही बाब ऑडिओ क्लिप मध्ये नमूद आहे.
याबाबत राजू कुडे यांनी लक्ष्मण पवार आपल्याला भेटले व त्या प्रकरणी त्यांच्यासोबत चर्चा ही झाली होती, सदर प्रकरणात मोहिते यांचा सहभाग असेल तर ही बाब गंभीर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लक्ष्मण मोहिते हा मला नेहमी पैश्यासाठी ब्लॅक मेल करीत असल्याची माहिती दिली.
सोबतच 2 मे 2022 ला लक्ष्मण पवार यांनी राजेश मोहिते यांच्याशी माझा काही संबंध नाही, त्यांना मी चुकीने त्रास दिला आहे, त्यांच्यासोबत माझा काही व्यवहार झाला नाही, त्यांच्यावर केलेले सर्व आरोप मी मागे घेत आहो, भविष्यात मी कधीही राजेश मोहिते यांना त्रास देणार नाही असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
लक्ष्मण पवार ने स्वतःवर चाकूने वार का केला? मी भविष्यात कधीही मोहिते यांना त्रास देणार नाही असा प्रतिज्ञापत्र लिहून दिलं असताना सुद्धा हा प्रकार कसा घडला? यामुळे सध्या अनेक संभ्रम निर्माण झाले आहे.
(सदर कथित ऑडिओ क्लिप मध्ये, किती सत्यता आहे, याची पडताळणी करण्याची गरज आहे, News34 सदर क्लिप खरी आहे की नाही याचा दावा करीत नाही.)