News34 chandrapur
चंद्रपूर - गणेशोत्सव सण जवळ आल्याने गणेशभक्तांनी श्री गणेश आगमनाची जय्यत तयारी सुरू केली आहे, कोरोना काळात या उत्सवावर अनेक निर्बंध शासनाने लादले होते, कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने पुन्हा जल्लोषात गणेश भक्त सहित डीजे धारक ही तयारीला लागले आहे. Ganeshotsavगडचिरोली जिल्ह्यातील डीजे वादक पंकज बागडे व सावली तालुक्यातील अनुप ताडूलवार मित्रासाहित बोलेरो गाडीने चंद्रपूरला डीजे चे साहित्य घेण्याकरिता आले होते. Terrible accident
यावेळी त्यांच्यासोबत पत्नी व मेहुणा ही चंद्रपूरला आले होते. Dj sound
साहित्य घेतल्यावर परतीच्या प्रवासात जात असताना वाटेत सावली तालुक्यातील किसाननगर येथे पोहचल्यावर मार्गावर गायी बसल्या होत्या, रात्रीची वेळ असल्याने वाहनचालकांने गायीला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक स्टेअरिंग रॉड steering rod तुटल्याने बोलेरो वाहन उभ्या ट्रकला जाऊन धडकले.
या भीषण अपघातात पंकज किशोर बागडे (२६, रा. गडचिरोली), अनुप रमेश ताडूलवार (३५, रा. विहीरगाव ता. सावली), महेश्वरी अनुप ताडूलवार (२४, रा. विहीरगाव, मनोज अजय तीर्थगिरीवार (२९, रा. ताडगाव ता.भामरागड, जि. गडचिरोली) यांचा मृत्यू झाला तर सुरेंद्र हरेंद्र मसराम (२३, रा. चिखली ता. सावली जिल्हा चंद्रपूर) हे जखमी झाले.