News 34 chandrapur
चंद्रपूर :- दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे शहारातील कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन चा सोहळा साजरा करण्यात येतो. Raksha bandhan
यावर्षी सुद्धा महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील मनसे महिला सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून शहारातील शहर पोलीस स्टेशन रामनगर पोलीस स्टेशन व ट्रॅफिक पोलीस प्रशासनाच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी मनसे महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड,जिल्हाउपाध्यक्ष शोभा वाघमारे,माजी नगरसेविका सीमा रामेडवार,जिल्हासचिव अर्चना आमटे,शहर उपाध्यक्ष प्रीती रामटेके,शहर उपाध्यक्ष विमल लांडगे,विभाग अध्यक्ष वर्षा भोमले,बल्लारपूर शहर अध्यक्ष मंगला घडले, शाखा अध्यक्ष शमीम खान, मंगला चांदेकर,शहर संघटक मनोज तांबेकर, राज वर्मा,राहुल भटवलकर इत्यादींची उपस्थिती होती. Chandrapur police