News34 chandrapur
वणी/चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मौदा या गावी स्थित विदर्भ प्रोजेक्ट कंपनीमध्ये 30 ऑगस्टला 27 वर्षीय महाकाली विठ्ठल भोस्कर या कामगारांचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला होता. Worker die
Electric shock
Electric shock
कंत्राटदार काळे यांनी या प्रकरणाची वाच्यता कुठे होऊ न देण्यासाठी तात्काळ महाकाली चा मृतदेह टेम्पो मध्ये टाकून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला.
विशेष म्हणजे वणी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात त्या कामगाराला नेता आले असते पण कंत्राटदाराने तसे केले नाही.
याकरिता कंपनीचे प्रमुख इस्माईल जव्हेरी व कंत्राटदार हर्षल काहाळे यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मौदा गावातील नागरिकांनी केली.
महाकाली हा blasting चे वायर चेक करत असताना त्या वायर मधून वीज प्रवाह सुरू असल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागला.
घटना घडल्यावर कामगारांच्या परिवाराला काही मदत मिळावी यासाठी गावातील सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्षांनी जव्हेरी यांना सम्पर्क केला असता त्यांना काही प्रतिसाद मिळाला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
याबाबत कंपनीचे प्रमुख इस्माईल जव्हेरी यांच्याशी सम्पर्क केला असता त्यांनी सांगितले की मृतक कामगार हा कंपनीमध्ये कार्यरत नव्हता, तो कंत्राटदार काहाळे यांच्यासोबत 2 तासासाठी कामाला आला होता, तो मागील 3 वर्षांपासून कंत्राटदाराजवळ काम करीत असल्याची माहिती आहे. त्याचा मृतदेह हा कम्पनी परिसरात मिळाला नसून शेताजवळ मिळाला होता.
तरीसुद्धा तो कुणाचा मुलगा तर कुणाचा भाऊ होता व विशेष म्हणजे तो काम करण्यासाठी आला होता, एक माणुसकी म्हणून कम्पनी व कंत्राटदार तर्फे मृतक महाकाली यांच्या आईच्या नावाने फिक्स डिपॉझिट व एकाला नोकरी सहित आर्थिक मदत करणार असल्याची प्रतिक्रिया जव्हेरी यांनी News34 सोबत बोलताना दिली.
जी घटना घडली ती अतिशय दुःखद आहे, मात्र कम्पनी व कंत्राटदार कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्या मृतक कामगाराला विम्याच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याचे जव्हेरी यांनी सांगितले.