News 34 chandrapur
राजुरा - राजुरा ते माणिकगढ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रुळावर शनिवारी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल होताच युवकाची ओळख 20 वर्षीय राहुल खोब्रागडे असल्याची माहिती मिळाली, सदर मृतक युवक हा शहरातील रमाबाई नगर येथील निवासी असून तो राजुरा नगरपरिषदेत घंटागाडी चालवीत होता. Murder or suicide
राहुल हा मागील 3 दिवसापासून बेपत्ता होता, त्याचा मृतदेह मागील 2 ते 3 दिवसापासून रेल्वे रुळाजवळ पडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. Crime
युवकाची कुणी हत्या करून मृतदेह त्याठिकाणी फेकला असेल काय? या दिशेने राजुरा पोलीस तपास करीत आहे.