News 34 chandrapur
चंद्रपूर - ताडाळी येथील indian oil corporation limited कंपनी मध्ये पेट्रोल टँकर चालविणारा वाहनचालक अतुल पवार यांची वाहन चालविताना प्रकृती खालावली व 14 ऑगस्टला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबावर मोठा आघात झाला, कंपनी प्रशासनाकडून पवार कुटुंबियांना काहीच मदत मिळाली नाही.
मृतकाच्या भावाने महाराष्ट्र नवनिर्माण महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. @MnsAdhikrut
मनसे अध्यक्ष गायकवाड यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष शोभा वाघमारे मृतकाच्या घरी पोहचल्या, सर्व प्रकरणाची शहानिशा केल्यावर पवार कुटुंबीय व शेकडो वाहनचालक समवेत सर्वांनी IOCL मध्ये धडक दिली.
अतुल पवार यांच्या कुटुंबात आई, पत्नी 5 वर्षाचा मुलगा व 9 महिन्याची मुलगी असून त्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न गंभीर झाला, iocl ने कसलीही मदत न केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी कम्पनी प्रबंधनाला याबाबत जाब विचारला असता कंपनीने आधी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला मात्र मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांच्या आक्रमक्तेपनामुळे कम्पनी प्रबंधनाला झुकावे लागले.
टँकर मालक व कम्पनी प्रबंधनाने चर्चा करीत पवार कुटुंबातील ज्योती पवार यांना दरमहा 5 हजार रुपये, लहान मुलींसाठी Sukanya Samruddhi Yojana मध्ये खाते काढत दरमहा म्हणजेच 18 वर्षे पैसे खात्यात जमा करणार व पवार कुटुंबातील एका सदस्यांच्या नावे दरमहा हजार रुपयांची LIC POLICY काढणार असल्याचे कबूल केले.
मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड व उपजिल्हाध्यक्ष शोभा वाघमारे यांच्या आक्रमकतेपणामुळे पवार कुटुंबाला अखेर न्याय मिळाला.
कंपनी प्रशासनाने मनसेची मागणी पूर्ण केल्याने पवार कुटुंबियांना मोठा आधार मिळाला, यावेळी उपस्थित शेकडो वाहनचालक व पवार कुटुंबातील सदस्यांनी सुनीता गायकवाड व शोभा वाघमारे यांचे आभार मानले.