News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होणारा महोत्सव म्हणजे गणेशोत्सव, कोरोना काळात 2 वर्षे निर्बंध असल्याने गणेशोत्सवाला अनेक निर्बंध लावण्यात आले होते.
Sp chandrapur
Sp chandrapur
आता कोरोनाचा प्रकोप कमी झाला असून यंदा कसलेही निर्बंध गणेशोत्सवावर लागणार नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी 25 ऑगस्टला शहरात पायदळ वारी केली. Ganeshotsav 2022
गणेश मंडळांना विसर्जन शोभायात्रेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र त्या अडचणी काय हे समजून घेत त्याचं निराकरण आधीच व्हावं यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची ही पायदळ वारी होती.
शहरातील रस्त्यांची अवस्था, विद्युत विभागाचे वायर, केबल अश्या अनेक गोष्टींची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली.
पाहणी केल्यावर गणेश मंडळांना काय अडचणी येऊ शकतात याचा आढावा घेतल्यावर संबंधित विभागाला त्या अडचणी दूर करण्यासाठी पोलीस विभाग पाठपुरावा करणार आहे. Chandrapur police
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या पायदळ वारी मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार, शहर पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे, वाहतूक निरीक्षक पाटील, रामनगर गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि हर्षल एकरे, पोउपनी सुजित बंडीवार, गुप्त विभागाचे दिलीप कुर्जेकर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.