News 34 chandrapur
चंद्रपूर: शहरातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय कडून बल्लारपूर कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे लाईनवर असलेल्या दुचाकी अपघात झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात घालवण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजता घडली. Flyover
बागला चौक ते लालपेठ पर्यंत जाणारा हा मार्ग नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे, मागील 3 वर्षांपासून या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य मोठया प्रमाणात वाढले आहे.
विशेष म्हणजे जनप्रतिनिधी या मार्गाचा वापर नेहमी करतात, मात्र त्यांना या मार्गाची दुर्दशा का दिसत नाही? हा मोठा प्रश्न आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत असून, अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे. पुलाच्या सदोष बांधकामामुळे हे अपघात घडत आहेत. Babupeth accident
19 डिसेंबर 2021 ला बाबूपेठ बायपास मार्गावरील असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर मद्यपी युवकांनी चारचाकी वाहन बेधुंद सुसाट चालविले. चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन सरळ पुलाचे कठडे तोडत खाली आदळली.
या अपघातात 2 युवकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही ते कठडे तसेच ठेवण्यात आले, प्रशासनाने कठडे दुरुस्त केले नाही. तब्बल 7 महिन्यांनी त्या घटनेची म्हणजेच 9 जुलै ला सायंकाळच्या सुमारास पुनरावृत्ती टळली. एक युवक बेधुंद व अति मद्य प्राशन करीत भरधाव वेगात त्या उड्डाणपुलावरून जात असताना वाहनावरील ताबा सुटला आणि पुलाच्या अपघातग्रस्त कठड्याला ते वाहन आदळले.
मात्र वाहनातील AirBag निघाल्याने त्या युवकाचे प्राण वाचले. अपघात होताच ते वाहन कठड्याला अडकून होते, नागरिकांनी तात्काळ ते वाहन मागे खेचले, या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज 11 ऑगस्ट रोजी पुन्हा याच पुलावर अपघात झाला असून युवक गंभीर जखमी झाला आहे. Accident series
सदर पुलावर अपघात झाले, पुलावरील कठडे दोन ते तीन ठिकाणी तुटले, मात्र त्यानंतरही संबंधित विभाग त्या कठड्याची दुरुस्ती करायला काही तयार नाही, सदर कठडे तुटल्याचा भाग हा वळणावर आहे, त्यामुळे अपघात झाला तर अपघातग्रस्त सरळ पुलाच्या खाली कोसळणार अशी अवस्था या पुलाची झाली आहे.
