News 34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील पठाणपुरा भागात भिंत कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.
गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश मंडळानी श्री गणेश आगमनाची तयारी सुरू केली आहे.
मात्र सदर तयारी करताना एका लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, 12 वर्षीय अधिराज बावणे आपल्या मित्रांसह घराजवळ तयारी करू लागला.
अधिराज हा आपल्या आजी-आजोबा हिवरे यांच्यासोबत राहत होता. Ganeshotsav 2022
श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी अधिराज ने साफ सफाई सुरू केली.
आपल्या घराच्या भिंतीजवळ असलेली रेती अधिराज ने उचलत बाजूला करण्यास सुरुवात केली मात्र रेती उचलल्यावर अचानक भिंत अधिराज च्या अंगावर कोसळली. 12 year boy died
अचानक घडलेल्या ह्या प्रकाराने नागरिकांनी तात्काळ अधिराज ला बाहेर काढत रुग्णालयात नेत असताना अधिराज चा वाटेत मृत्यू झाला.
अधिराज हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, या घटनेने हिवरे व बावणे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.