News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - मुल शहरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरवात झाली, भूतो न भविष्यती फक्त 3 ते 4 तासात 137 mm इतका पाऊस पडला, या झालेल्या मुसळधार पावसामुळे मूल शहरातील अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय तात्काळ दूर करण्याच्या उद्देश ठेऊन येथील प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते, नप कर्मचारी, महसूल कर्मचारी यांना सोबत घेत साचलेले पाणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. Record break rain
Heavy rains
Heavy rains
यावेळी मुसळधार पावसामध्येही कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला याबद्दल नगरपालिका कर्मचारीवर्गाचे आभार मानले.
यावेळी नगरपालिका मूल चे प्रशासक, उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर हे स्वता जातीने हजर राहत संपूर्ण शहरात फिरत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदुभाऊ रणदिवे, युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.