News 34 chandrapur
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - मुल वरुन वाहणारी उमा नदी आणि आसोला मेंढा तलाव पूर्ण १०० टक्के भरल्याने तलावातून निघालेला वेस्ट वेअर म्हणजे चीमढा नदी असा इतिहास आहे.
Flood alert
Flood alert
आणि चिमढा नदी ही मुल चामोर्शी मार्गाला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला वाहणाऱ्या उमा नदीला जाईंड झाल्यामुळे दोन्ही नद्या एकत्र आल्याने मुल-चामोर्शी नदी पुलावरून पुराचे पानी ओसंडून वाहत असल्याने चामोर्सी मार्ग बंद झाला असल्याने या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या बोरचांदली, राजगड, चांदापुर, फिस्कुटी, विरई, गडीसुरला, जूनासुर्ला, बेंबाळ, भवराला नवेगाव भूजला व त्यापलिकडेही गावाची वाहतूक खोळंबली आहे. करीता काही नागरिकांना व शाळेच्या शिक्षकांना देखील आकापुर मार्गाने किंवा भेजगाव मार्गाने जाणे येणे भाग पडले आहे. Chamorshi-Mool road closed due to flood
चामोर्शी मार्गावर मुल पोलिसांनी आपला बंदोबस्त लावला असून वाहतूक करणाऱ्यांना वाहतूक करण्यास मनाई करीत असल्याचे दिसून येत आहे. असेच रात्री सतत सारखा पाऊस राहिला तर मात्र उमा नदीचा पूर वाढून सभोवतालचे सर्व मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहेत. अशीच वाहतूक बंद राहिली तर मात्र नागरिकांचे तहसील,पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, मुलची मुख्य बाजार पेठची कामे असून पडणार हे नक्की.