News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - शहरातील महाकाली प्लायवूड च्या दुकाना जवळ एका अनोळखी व्यक्तीच्या मृतदेह शनिवार दि. 30 जुलै दुपारी दोन वाजताच्या सुमारास आढळून आला. Body of an unidentified man
सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर-नागपूर मार्गावरील सिंदेवाही शहरातील महाकाली प्लायवूड च्या दुकाना जवळ शनिवारी दि. 30 जुलै दुपारच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती शहरातील नागरिकांनी पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळाच्या पंचनामा करून मर्ग क्रमांक 30/ 2022 नोंद करून मृतदेह आपल्या ताब्यात घेतला पण त्या मृतदेहाची ओळख काही पटली नसून ते चंद्रपूरच्या शीतगृहामध्ये ठेवण्यात आले आहे. त्या इसमाने निळ्या कलरच्या शर्ट, जीन्स घातला असून वय अंदाजे 45 वर्षे दरम्यान आहे असे पीएसआय बळीराम गेडाम यांनी सांगितले आहे.