News 34 chandrapur
चंद्रपूर - सध्या चंद्रपूर जिल्ह्यात लहान मुलांचे हरविण्याचे प्रमाण वाढले असून अशीच एक घटना चंद्रपूर मधील इंदिरानगर येथे घडली. येथील स्थानिक पंचशील चौकात राहत असलेल्या साईनाथ चौधरी यांचा अंदाजे आठ ते नऊ वर्षाचा मुलगा वडिलांनी रागावल्यामुळे घर सोडून निघून गेला होता. Missing boy
त्यानंतर त्याला घरच्या पत्त्याचा विसर पडला नंतर तो आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राजू बक्षी राहणार बाबूपेठ लुम्बिनीनगर यांना दिसून आला. त्यांनी त्याची विचारपूस करून माहिती घेतली आणि संपूर्ण प्रकार पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी आपचे शहर सचिव राजू कुडे यांना कळविले. लगेच राजु कुडे यांनी इंदिरानगर येथील आपचे पदाधिकारी संतोष बोपचे यांना घटनास्थळी जाण्याचे सांगितले. बोपचे हे इंदिरा नगर परिसरात अनेकांना परिचित असून त्यांनी संबंधित मुलाचे नाव सांगताच त्याला ओळखले आणि त्यांच्या परिवाराला तो मुलगा आजच सुपूर्द केला. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच तत्परता दाखवून मुलाच्या शोधात असणाऱ्या त्या आई वडिलांना त्यांचा चिरंजीव सुपूर्द करून दिल्याबद्दल आपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केल्या जात आहे. Aam aadmi party chandrapur
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून अशी कुठलीही मदत जर कुणाला लागली तर त्या व्यक्तीने आम आदमी पक्षाशी संपर्क करावा अशी सुचना आपचे शहर सचिव राजू कूडे यांनी केली आहे.

