News 34 chandrapur
चंद्रपूर - मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी असण्याबरोबरच आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई हे फार महत्वाचे शहर आहे. या शहराच्या मध्यभागी मुंबईची शान तसेच संपूर्ण मुंबईला ऑक्सीजनचा पुरवठा करणारे आरेचे जंगल आहे. जगात अश्या प्रकारे नैसर्गिक जंगल लाभलेले निसर्गरम्य ठिकाण आहे.
mumbai metro car shed aarey
साल २०१४ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची जागा निवडण्यात आली. पर्यावरण प्रेमींच्या विरोधानंतरही दिनांक ४ ऑक्टोबर २०१४ रोजी रात्रीच्या अंधारात जंगलातील हजारो झाडे कापण्यात आली. त्यावेळी झालेल्या आंदोलनात २९ पर्यावरण प्रेमींना तुरुंगात डांबण्यात आले होते. पर्यावरण प्रेमींच्या सुटकेसाठी व आरे जंगलमधील मेट्रोची कारशेड रद्द होऊन जंगल वाचावे म्हणून झालेल्या आंदोलनात आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक व त्यांचे सहकारी सुद्धा सहभागी होते.
Save aarey
या आंदोलनाची दखल घेवून तत्कालीन मुख्यमंत्री नामदार श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची ही जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले. मुंबई व महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी जनतेनी या निर्णयाचे स्वागत केले. Mumbai aarey
आपणाही महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत होते त्यामुळे या स्वागतार्ह निर्णयाचे श्रेय आपणांसही जाते.
aarey metro shed
आपल्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकार - मार्फत आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही अशाप्रकारे घोषणा झाली. सदर घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमी फार नाराज झाले आहेत.
नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आपणास विनंती आहे की मुंबईची फुफ्फुसे असलेले हे आरेचे जंगल कोणत्याही परिस्थितीत मेट्रो कारशेडसाठी न देता जंगल म्हणूनच अबाधित राहण्याची भूमिका आपण घ्यावी. जेणेकरून निसर्गाचे तसेच मुंबई व महाराष्ट्रातील करोडो जनतेला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे अशी मागनी चंद्रपुर शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागातर्फे करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हने यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रपुर शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष ताज कुरेशी, उपाध्यक्ष अखिलेश जनबंधू, धीरज, महेश, प्रभाग अध्यक्ष स्वप्निल चिवन्डे, अक्षय जुमडे, प्रकाश देशभ्रतार शोहेल, सतपाल, प्रवीण व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चंद्रपुर शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष ताज कुरेशी, उपाध्यक्ष अखिलेश जनबंधू, धीरज, महेश, प्रभाग अध्यक्ष स्वप्निल चिवन्डे, अक्षय जुमडे, प्रकाश देशभ्रतार शोहेल, सतपाल, प्रवीण व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

