News 34 chandrapur
चंद्रपूर - जून २०२२ या महिण्यात, चंद्रपूर परिमंडळात १ लाख १२ हजार ग्राहकांनी सुमारे ३७ कोटी १९ लाख एका क्लिकवर जागच्या जागी लाईनीत न लागता किंवा घराबाहेर न पडता आपले वीजबिल ऑनलाईन पध्दतीने भरले तसेच महावितरण मोबाईल ॲप वापरुन केला आहे.
Msedcl online
Msedcl online
चंद्रपूर मंडलातील १ लाख १२ हजार ५२ ग्राहकांनी जून महिण्यात २६ कोटी ३३ लाख वीजबिल ऑनलाईन व ॲपचा वापर करीत भरले आहे. बल्लारशा विभागातील २८ हजार २५२ ग्राहकांनी ५ कोटी ७३ लाख ९२ हजार, चंद्रपूर विभागातील ५० हजार ४१० ग्राहकांनी १४ कोटी ४३ लाख ६५ हजार, वरोरा विभागातील ११२०५२ ग्राहकांनी २६ कोटी ३३ लाख ४० हजार भरले आहे.
गडचिरोली मंडलातील ८३ हजार ९३७ ग्राहकांनी १० कोटी ८५ लाख ६० हजाराचे वीजबिल ऑनलाईन व ॲपचा वापर करीत भरले आहे. आल्लापल्ली विभागातील १८४१६ ग्राहकांनी २ कोटी २२ लाख ३२ हजार, ब्रम्हपुरी विभागातील ३३३५८ ग्राहकांनी ३ कोटी ७१ लाख ३३ हजार, गडचिरोली विभागातील ३२१६३ ग्राहकांनी ४ कोटी ९१ लाख ९३ हजार भरले आहे.
महावितरण ग्राहकांना प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरण अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते प्रसंगी महागडी वीज खुल्या बाजारातून वीज खरेदी करुन ग्राहकांना सेवा देत आहेत. अशावेळी एवठयासाऱ्या सुविधा उपलब्ध असतांना ग्राहकांनी त्याच्या लाभ घ्यावा व वेळेत वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे तसेच अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन ग्राहकांनी ऑनलाईन माध्यमातून वीजबिल भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
महावितरणच्या विविध सेवा महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल ॲप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र RTGS सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाईन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. Online payment
लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल ॲपची सोय उपलब्ध करून दिली आहे.
वीजबिलावर छापलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करून ग्राहकांना यूपीआयद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासंदर्भात नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर पाठवण्यात येणाऱ्या एसएमएस मध्येही पेमेंटची लिंक देण्यात येत आहे. याबरोबरच भारत बिल पेमेंट सर्व्हिस, ईसीएस/ईबीपीपी/एनएसीएच, सेंट्रलाइझ्ड ग्रूप बिल पेमेंट, महापॉवरपे वॉलेट हे मार्गही ऑनलाईन पेमेंटसाठी उपलब्ध आहेत. Wallet
मोबाईल ॲप तसेच ५० लाख् ग्राहकांकडून डाउनलोड करण्यात आलेले महावितरण ॲप ग्राहकांना मदतीचे ठरत आहे. ॲपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, नवीन ग्राहक क्रमांक जोडण्याची किंवा काढण्याची सुविधा, गो-ग्रीन म्हणजे ई मेलवर वीजबिल प्राप्त् करण्याची सुविधा मिळविणे, ग्राहकसेवा केंद्र व जवळचे कार्यालयाची तसेच वीजबिल भरणा केंद्राची माहिती, नवीन जोडणी साठी अर्ज करणे व सध्याची अर्जााची स्थिती जाणून घेणे. नाव बदलण्याची मागणी, वीजजोडभार बदलण्याची मागणी, पुर्णजोडणी शुल्क भरण्याची सुविधा, उपयुक्त संकेतस्थळाचे दुवे, वीजदेयक भरणा करण्याची सुविधा, वीजदेयक व वीजदेयक भरणा केल्यासंबंधी तत्सम पुर्व माहिती, याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही त्यांना ॲपद्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय तक्रारी देखिल या ॲपद्वारे करण्यात येणे शक्य आहेत.
कृषि वीज योजना २०२० नुसार कृषिपंपाची थकबाकी पाहण्याची सुविधा, वीजबिलासंबंधी तसेच वीजपुरवठा ख्ंडीत झाल्या संबंधी तक्रारी नोंदविण्याची सुविधा, वीजग्राहकांना ज्या वीजवाहिणीवरुन वीजपुरवठा होतो त्या वीजवाहिणीची माहिती, नादुरुस्त् रोहित्रासंबधी महिती नोंदविणे, वीजचोरीची माहिती कळविणे, संपर्काची माहिती अदययावत करणे तसेच अभिप्राय कळवणे. इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. हे ॲप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, ॲपल, विंडोज प्ले स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.