चंद्रपूर - गेल्या 15 दिवसात विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा अनेक जिल्ह्याला फटका बसला, इतकेच नव्हे तर अतिवृष्टी मध्ये आलेला महापूर यामुळे विदर्भातील शेती अक्षरशः पाण्याखाली गेली. Heavy rain in vidarbha
याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार 28 जुलैला चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. Leader of the Opposition in the Legislative Assembly
अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली, पुराच्या पाण्यामुळे पीक बुडाले होते, 15 जुलै ला प्रत्यक्ष
दौऱ्याची विनंती करीत पूर परिस्थिती ची पाहणी करून मदतीसाठी शासनदरबारी ही व्यथा मांडायची असल्याने 28 जुलै ला विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित पवार व राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तिन्ही जिल्ह्यात जात पाहणी करणार आहे.
या दौऱ्यात गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुके, चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात शेतीची पाहणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कांग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रक द्वारे दिली आहे.