News 34 chandrapur
घुग्घुस - चंद्रपूरच्या आमदारसाहित अनेक आमदारांनी सत्तेसाठी बंड केलं, मात्र हे आमदार क्षेत्राच्या विकासासाठी कधी बंड पुकारणार असा प्रश्न नागरिक करू लागले आहे. Road pit
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील सर्वात प्रदूषित शहर म्हणजे घुग्घुस, या परिसरात जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते, जड वाहतूक आणि भयावह प्रदूषणाने घुग्घुस शहराला वेढा घातलेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, अश्यातच अनेक मार्ग खड्ड्याखाली गेले आहे. Heavy traffic
घुग्घुस-म्हातारदेवी व ताडाळी मार्गावर सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे रस्त्यावर चक्क 3 फूट खोल खड्डे निर्माण झाले आहे. Mla kishor jorgewar
या खड्ड्यामुळे अनेकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे, मात्र प्रशासन पुन्हा खड्ड्याची प्रगती बघण्यात व्यस्त आहे .
आज तर चक्क 22 चाकी ट्रेलर बोनट पासून वेगळा झाला, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी नंतर 22 चक्का ट्रेलर आज त्या खड्ड्यांचा जणू शिकार बनला असल्याचे चित्र दिसू लागले आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर-घुग्घुस मार्गावर असलेल्या टोल बूथ चे पैसे वाचविण्यासाठी जड वाहतूक चालक म्हातारदेवी या मार्गाचा अवलंब करतात यामुळे रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे.
प्रशासन फक्त दाखविण्यासाठी सदर खड्ड्यात गिट्टी टाकून आपण आपली जबाबदारी पूर्ण केली असे दाखवितात.
खड्ड्यामुळे नेहमी होत असलेल्या अपघाताने आता नागरिकही चांगलेच संतापले आहे.
लवकरच रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे अन्यथा सामान्य नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागणार.

