News 34 chandrapur
चंद्रपूर - 3 दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इराई धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता असल्याने चंद्रपूर मनपाने नदी काठावर राहणाऱ्या नागरिकांना नदीच्या पात्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. Irai Dam
जुलै महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात थैमान घातले आहे, heavy rain त्यामुळे इराई धरणाच्या पातळीत सतत वाढ होत असून धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता आहे. Chandrapur municipal council
त्यामुळे ईरई नदीच्या काठावर राहणाऱ्या १) ईरई नदी लगत वडगांव वार्ड हवेली गार्डन एरीया, नगिनाबाग वार्ड महसुल कॉलनी, सिस्टर कॉलनी एरीया, रहेमत नगर वार्ड रहेमत नगर एरीया २) झरपट नदी लगत तुळजा भवानी वार्डात भंगाराम ऐरीया, महाकाली वार्ड- सोनारी मोहल्ला एरीया, दादमहल वार्ड- काजीपुरा वसाहत ऐरीया राहणाऱ्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी स्वतः नदीच्या पात्रापासून दुर सुरक्षित ठिकाणी रहावे तसेच आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दुर ठेवण्यात यावी. Flood alert

