News 34 chandrapur
बल्लारपूर - माणुसकीला लाजवेल असे कृत्य जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये घडले आहे. Inhuman actएका निष्पाप पाळीव कुत्र्याच्या पायाला भला मोठा दगड बांधण्यात आला. त्यानंतर तोंड ताराने बांधून नदीमध्ये फेकून देण्यात आले.
Viral video
Viral video
विशेष म्हणजे यासंदर्भातील व्हिडिओही वायरल करण्यात आला आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये निष्पाप कुत्र्याचा मृत्यू झाला. बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये काही युवकांनी एका पाळीव कुत्र्याला अमानुषपणे ठार केले. तीन ते चार युवकांनी प्रथम कुत्र्याच्या पायाला दगड बांधला आणि मानेला फास आवळून त्याला नदीच्या पाण्यात मरण्यासाठी फेकून दिले. जिवाच्या आकांताने मोठ्या प्रयत्नाने तो नदीतून पोहून बाहेर आला. The youth killed the dog
पाळीव असल्याने पुन्हा तो त्या युवकांजवळ आला. मात्र त्याला मारण्याचा पूर्णपणे विचार करून आलेल्या युवकांनी त्याचे पाय बांधून भलामोठा दगड बांधला. त्यानंतर तोंडाला ताराने बांधून पुन्हा नदीच्या पाण्यात फेकले. या वेळी मात्र तो पाण्यातून वर आलाच नाही. या संदर्भातील व्हिडिओ सर्वत्र वायरल होत आहे. Chandrapur news
प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापेल्ली यांनी याबाबत बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र अजूनही त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही अश्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही रापेल्ली यांनी केली आहे. Pyar foundation

