News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल - मूल तालुक्यातील चिचाळा येथील अंबादास निकेसर यांचे घर पडल्यांने, शेजारी गोठ्यात बांधून असलेल्या दिलीप बिजाजी लेनगुरे यांचे मालकिचे चार शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून, 10 शेळ्या जखमी झाल्या आहेत.
4 goats died
4 goats died
मूल वरून पाच किलो मिटर अंतरावरील चिचाळा येथे दिलीप बिजाजी लेनगुरे यांनी आपल्या गोठ्यात 14 शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. Heavy rain संततधार पावसामुळे दिलीप लेनगुरे यांचे शेजारी असलेल्या अंबादास निकेसर यांचे घर कोसळले. हे घर दिलीप लेनगुरे यांचे शेळ्या बांधलेल्या गोठयावर पडले. यामुळे झालेल्या अपघातात दिलीप लेनगुरे यांचे 4 शेळ्या जागीच मृत तर 10 शेळया जखमी झाल्या आहेत.
दिलीप लेनगुरे यांची मोठी नुकसान झाली असून, आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दिलीप लेनगुरे यांनी केली आहे.

