News34 chandrapur
भद्रावती - तालुक्यात अतीवृष्टी होत असून या आठवडयात जोरदार पाऊस बरसत आहे. भद्रावती - देऊळवाडा मार्गावरील रेल्वे गेटजवळच्या रेल्वे पटरी खाली खोदलेल्या बोगदयाच्या मातीमुळे पाणी वाहून जाण्याचा नेहमीचा मार्ग अडला. यामुळे देऊळवाडा शेत शिवारातील सुमारे वीस शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने या शेतकऱ्यांच्या पिकांची अपरिमित हानी झाली.
या सर्व नुकसानीचे प्रशासनाच्या माध्यमातून विनाविलंब सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना भरीव आर्थीक सहकार्य करावे. अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा श्रीनिवासराव शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी केली आहे.
काल दि. ९ जुलै रोजी देऊळवाडा येथील पर्जन्य स्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. देऊळवाडा येथील शेतकरी सुरेश आस्वले यांच्याशी संपर्क साधला असता, पाऊसामुळे देऊळवाडा शेत शिवारातील शेतकरी विठ्ठल आस्वले, मधूकर फोफरे, रमेश बावणे, ज्ञानेश्वर आस्वले, मारोती आस्वले, एकनाथ पारखी, तुळशीराम आस्वले, निळकंठ आस्वले, मधुकर कळसकर, रामचंद्र आस्वले, मधुकर पारखी , रमेश आस्वले आणि इतर अश्या एकूण वीस शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान झाल्याचे समजते.
Farm underwater
प्राप्त माहिती वरून कळते की, रेल्वे प्रशासनाच्या वतीने भद्रावती - देऊळवाडा मार्गावर असलेल्या रेल्वे गेट जवळ रेल्वे पटरी खाली सुमारे दिड महिन्यापूर्वी बोगदा खोदून नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरु झाले. बोगदा खोदतांना बाहेर काढलेली माती रेल्वे पटरीच्या बाजूला टाकण्यात आली. यामुळे पाऊसाचे पाणी वाहूण जाणारा नेहमीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. याचा विपरीत परीणाम म्हणून पाऊसाचे पाणी परीसरातील वीस शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. शेतात पाणी घुसल्याने संबंधीत शेतकऱ्यांनी अलिकडेच लागवड करुन उगवन झालेल्या कपाशी, सोयाबीन व तुर पिकांचे नुकसान झाले. यात काही शेतकऱ्याचे भाजीपाला पिक सुध्दा नष्ट झाल्याचे समजते. सदर पाणी भद्रावती -देऊळवाडा मार्गावर सुध्दा पघरले होते.
सध्या बोगदयाजवळ बेसुमार चिखल झाल्याने येथील नागरिकांना तीन किमीचा अतीरिक्त फेरा मारून ये -जा करावे लागत आहे. लागवड केलेले पिक नष्ट झाल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्या सर्वांना शासन व प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी केली आहे.