News 34 chandrapur
चंद्रपूर - सौर ऊर्जेला प्रोत्साहन देताना सोलर रूफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना अनुदान देण्यात येणार असून याकरीता नवीन व नवीकरनीय उर्जा मंत्रालयाद्वारा सोलर रूफ टॉप योजना जाहिर केली आहे. या योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांकरीता जास्तित जास्त ४० टक्क्यांपर्यंत अनूदान देण्यात येणार आहे. महावितरणने अधिसुचना निर्गमित करत त्यासाठी पोर्टल तयार केलेले आहे. home solar power system cost
या योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॅटपर्यंत जोडभार असल्यास ४० टक्के अनूदान दिले जाईल. घरगुती ग्राहकांचा जोडभार १० किलोवॅट जोडभारापर्यंत असल्यास पहिल्या तीन किलोवॅटवर ४० टक्के तसेच त्यानंतर ७ किलोवॅटवर २० टक्के अनूदान देण्यात येणार आहे. तर, १० किलोवॅटपेक्षा अधिक जोडभार असलेल्या घरगुती ग्राहकांना सोलर रुफ टॉपवर कोणतीही सबसिडी या योजने अंतर्गत नसेल. तसेच गृहनिर्माण संस्था व घरगुती कल्यान संघटनांना ५०० किलोवॅटर्यंतच्या जोडभारासाठी या योजनेतून लाभ घेता येईल. परंतु त्यासाठी प्रत्येक घरासाठी मंजूर जोडभार १० किलोवॅट पर्यंतच्या मर्यादेत असावा लागणार आहे. solar energy system for home
ग्रीड इंटरॅक्टिव रूफटॉप रिनिवेबल एनर्जी जनरेटींग सिस्टीम अंतर्गत नेट मिटरींगचे निर्देषानुसार ही व्यवस्था करावी लागणार आहे. महावितरण या कामी लावण्यात येणाऱ्या संचाचे निरिक्षण करून ते व्यवस्थित असल्याचे प्रमाणित करणार आहे. solar rooftop subsidy yojana
निवड झालेल्या एजंसीला सोलर रूफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना उच्चतम सेवा देण्याचे बंधन या येाजने अंतर्गत आहे. एजेंसीला आवश्यक संचाच्या सर्व सुटया भागांचा साठा करून ठेवावा लागणार आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थिीमध्ये या संचांचे दुरूस्ती काम करण्यासाठी सेवाकेंद्र उभारून त्यात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. ही सेवाकेंद्रे आठवडयातून सुटीचे दिवस वगळता सहा दिवस ८ तास सेवा देणार आहे.
सबसिडीसाठी कंपनीच्या पोर्टलवर अर्ज करुन अधिकृत वेंडरकडूनच सोलर रुफटॉप इच्छुक ग्राहकांना लावता येईल महावितरणच्या¬ www.mahadiscom.in/smart/ किंवा www.mahadiscom/consumerportal/renewable energy portal/solar rooftop लिंकवर जावून अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. याकरीता १३ सोलर रूफ टॉप एजंसीची नेमनुक करण्यात आली आहे.
त्याबाबत तपशील महावितरण च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. Msedcl solar

