News 34 chandrapur
चंद्रपूर- झी News च्या zee news dna डीएनए या प्राईम टाईम शोमध्ये काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल चा चुकीचा व्हिडीओ दाखवला. राहुल गांधी यांनी, त्यांच्या वायनाड येथील कार्यालयात तोडफोड झाली, त्याबद्दल ते लहान मुलं आहेत. मी त्यांना माफ करतो. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने जावे, असे आवाहन केले. याच विधानाचा झी टीव्हीने विपर्यास केला. rahul gandhi fake news
राहुल गांधी यांचे हे विधान राजस्थानमधील उदयपूर येथील घटनेशी जोडून याचे विडिओ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी, कार्यकर्त्यांनी सामाजिक माध्यमातून शेअर केला. आणि राहुल गांधी यांची बदनामी केली. जेव्हा यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा मानवीय चूक, असे सांगून माफी मागून मोकळे झाले. पण अजूनही हा व्हिडिओ वायरल होत आहे. zee news apology
याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झी मिडिया विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नम्रता ठेमस्कर यांनी झी मीडिया हा गोदी मीडिया बनला आहे. आणि अशा चॅनेलमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे. तसेच राहुलजींची अशी बदनामी यापुढे खपवून घेणार नाही. भाजपच्या सर्व मंत्र्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर वरून लगेच काढावा, अन्न्यथा यापेक्षा मोठे आंदोलन काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ठेमस्कर यांनी दिला. zee news rahul gandhi
जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. Congress protest against zee news या आंदोलनाला घुगूसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी, मतीन कुरेशी, माजी नगरसेविका सुनीता लोढिया, संगीता भोयर, बल्लारपुर तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, शहर अध्यक्ष मेघा भाले, सांगलीच्या नगराध्यक्षा लता लाकडे, शहर अध्यक्ष भारती चौधरी,नगरसेविका ज्योति शिंदे, ज्योती गेडाम, राधा तातकोंडवार, अंजली देवगडे, संध्या ढोले,चिमूर तालुका अध्यक्ष सविता चौधरी, माजी जीप सदस्य गीता रानडे,स्मिता पारधी, उपाध्यक्षा सुनीता धोटे,हर्षा हर्षा चांदेकर, रेखा रामटेके, वाणी डारला, शितल कातकर,शालिनी भगत, लता बारापात्रे, मंगला शिवरकर, संगीता मित्तल, नेहा मेश्राम,एजाज कुरेशी, बबलू कुरेशी, सुनील चौहान, अनंता गिरडकर, हाजी अली, वैशाली जोशी, संध्या डोले, ज्योती गेडाम, ज्योती शिंदे, अंजली देवगडे, रीता रॉय, लक्ष्मी सिरदार, शालू दास, काजल विश्वास, भानु रॉय, गीता माली, कदम खाकर, कनिका मवाली, सुनीता थोड़े, मीनाक्षी गुजरकर, निधि चौधरी, पूनम वर्मा ,रिता जैस्वाल, सीमा दूर्वे, फातिमा सय्यद, प्रेमिला नभाते, आशा बोरकर, परवीन पठान, जमैला कोरडावार, नूरजहाँ शेख, शबाना खान, अर्चना मूलकर, छाया नभमोटे, विमला गुप्ता, रिता जैस्वाल, आनंदी जैस्वाल,सैय्यद अनवर, अलीम शेख,मोसिंम शेख,रोशन दंतलवार,नुरूल सिद्दीकी,इर्शाद कुरेशी, विशाल मादर,सुकुमार गुंडेटी, रफिक शेख,देव भंडारी, साहिल सैय्यद,संगीता बोबडे, पुष्पा नक्षीने, सरस्वती कोवे,मंगला पोरर्शेट्टीवार यांची उपस्थिती होती. rahul gandhi on udaipur killing


