चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात गेली 15 दिवस पावसाने थैमान घातले होते, संततधार पावसाने जिल्ह्याला चारही बाजूने पुराने वेढले, हजारो घर पाण्याखाली, हजारो हेक्टर शेत नष्ट झाले, अनेक नागरिकांचा बळी गेला.
Flood affected people
Flood affected people
आपत्ती व्यवस्थापनाने महत्वपूर्ण कामगिरी बजावत हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले, राज्यात सत्ताबदल झाल्याने कुणी मंत्री पुराचा आढावा घेण्यासाठी आले नाही.
पावसाचा जोर कमी झाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी रहमतनगर व सिस्टर कॉलनी प्रभागात गर्दी करू लागले. Chandrapur flood
पूर पीडितांना धान्य किट, शासनाची मदत, उपचार यासाठी जनप्रतिनिधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले मात्र या पुराचे पाणी शहरी भागात का शिरले यावर कुणी बोलले नाही. Ajit pawar in chandrapur
पण विधानसभेचे विरोधी पक्षनेता अजित दादा पवार आज 28 जुलै ला चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटत त्यांच्या समस्या जाणून घेत आपुलकीने नागरिकांशी संवाद साधला व अवघ्या 5 मिनिटात पुराचे कारण काय व त्यावर तोडगा काय ? या सर्वांचे उत्तर सुद्धा शोधून नागरिकांना विश्वासात घेतले.
रहमतनगर व सिस्टर कॉलनी येथील नाल्या भोवताल नागरिकांनी आपली घरे बांधली, एकाचे बघून अनेकांनी नाल्याच्या बाजूने अतिक्रमण केले, पाऊस जास्त पडला तर नाल्याचे पाणी पुढे जाण्याकरिता मार्ग नसल्याने संपूर्ण पाणी निवासी वस्तीमध्ये शिरते, पण त्यावर तोडगा काय?
अजित दादांनी बेधडक नागरिकांना विश्वासात घेत तुम्ही आपले अतिक्रमण काढा, कारण नाल्याचे पाणी जायला मार्ग नाही, त्यामुळे पुराचा फटका आपल्याला बसत आहे.
कठोर निर्णय घ्या आणि अतिक्रमण तात्काळ काढा, मात्र अतिक्रमण काढल्यावर तुम्ही कुठे जाणार यावर घाबरू नका प्रशासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही चांगल्या ठिकाणी तुमच्या राहण्याची सोय करून देणार.
अजित दादांच्या या निर्देशानंतर नागरिक सुद्धा अतिक्रमण काढायला तयार झाले, जे कुणाला जमलं नाही ते दादांनी आपल्या पहिल्या भेटीत करून दाखविलं.
नाहीतर आपल्या जिल्ह्यातील जनप्रतिनिधी फक्त पुराचे पाणी बघायला येतात पण त्यावर तोडगा काही काढत नाही.
कारणही तसेच मतदार तुटतील न, जनप्रतिनिधी मताचे राजकारण करीत आहे, पण सामाजिक व राजकीय जाणं असलेला नेता जेव्हा नागरिकांना विश्वासात घेऊन काम करतो तर स्थानिक जनप्रतिनिधी का नाही करू शकत?
aaaaaaaaaaaaaaaaaaa
उत्तर द्याहटवा