News 34 chandrapur
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - काल रात्रीपासून सुरु असलेल्या सततधार पाऊसाने मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधवांचे ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले असल्याने शेतकऱ्यांचे सर्व पीक वाहून गेले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी धानाचे पऱ्हरे वाहून गेले तर कापूस,सोयाबीन, भाजीपाला पाण्यावर पोहत आहे. तालुक्यात झालेल्या पाऊसाची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली असून मुल शहरात १३८ मिलिमीटर पाऊस पडला तर ग्रामीण भागात बेंबाळ ७६.५, चिखली २६.३, सरासरी ७६.९ तालुक्यात प्रोग्रेसिव नोंद ९७४.३ करण्यात आली असून तालुक्यात असलेले संपूर्ण तलाव,नाले, नदी, बोडया, शेत तलाव, तुडुंब भरले आहे. Heavy rain
एकंदरीत अतिवृष्टी झाली आहे. आज सकाळी अंधारी नदीला पूर आल्याने मुल चंद्रपूर मार्ग बंद झाला. मुल मरोडा मार्ग बंद झाला आहे. मुल चामोर्शी मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. शेतीकडे जाण्यासाठी केलेले अनेक पांदन रस्ते वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील डांबरीकरणाचे रस्ते फुटून गेले आहेत.
खेडे गावातील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांवर असलेल्या संकट कालीन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन व झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन अतिवृष्टी मुले मुल सावली असे पूर्वीचे संयुक्त दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. Maharashtra flood update तालुक्यातील अतिवृष्टीमुळे लहान मुलांच्या शाळांना सुटी द्यावी (संतोषशिंह रावत) मुल तालुक्यात १३९ मिलिमीटर पाऊस पडला असल्याने अतिवृष्टी झाल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली आहे. मुल नगरातील व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले अजूनही पाऊसाचा जोर कायम दिसून येत आहे. अशा वेळेला आज पाऊस सुरु असताना प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि कॉन्व्हेंट मधे लहान लहान मुलांना छत्री, रेनकोट घालून नेऊन देताना पालकांची चांगलीच तारांबळ दिसून आली. जोरदार पाऊसाच्या सरी येत असताना काहीही केले तरी मुले ओले झालीच. पुन्हा पाऊस किती दिवस येईल आणि कसा येईल याची काहीही शास्वती नाही. यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी वर्गाच्या लहान मुलांसाठी जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे. Flood 2022 update

