News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी नेहमीच संकटाशी सामना केव्हा नैसर्गिक, आकस्मिक, संकट येईल हे सांगता येत नाही. अशीच वेळ काल मुल तालुक्यातील राजोली येथील शेतकरी शामसुंदर मारोतराव रेवनवार यांची एकूण १८ एकर शेती चिखली कन्हाळगाव शिवारात भुमाक क्रमांक १३२/१ असून त्यापैकी ९ एकर शेतीत खरीप हंगामाचे धानाचे पीक घेण्यासाठी कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार बेड (वाफे) पेरणी करुन पद्धतीने पऱ्हे टाकले.नुकत्याच तीन दिवसापासून सतत येत असलेल्या पाऊसामुळे रोवणी करण्यासाठी रोपे तयार झाल्याने उद्यापासून रोवणी करण्यास सुरुवात करण्याची संपूर्ण तयारी केली. दोन ट्रॅक्टर लाऊन नांगरणी चिखलणी सुद्धा करुन घेतली. Wild boar
रोवणी करिता आवश्यक येवढे महिला माणसे मजूरही ठरविले आणि उद्या सकाळी रोवणीला सुरुवात करणार असे ठरले असताना आदल्या दिवशीच्या सायंकाळी वन विभागाच्या रानटी डूकरांणी रोवणी करण्याचे पऱ्हे पूर्ण खाऊन नासधुस करुन ठेवल्याने बिचाऱ्या शेतकऱ्याचे ९ एकराच्या परह्याचे खूप मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पूर्णच धानाचे पऱ्हे गेल्याने परत शेतकऱ्यांवर रोवणी करण्याऐवजी दुबार पेरणीचे वेळ आली आहे. ९ एकर धान रोवणीची नुकसान झाल्याने वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली व क्षेत्र सहाय्यक राजोली यांचेकडे लेखी तक्रार दिली असून वन परिक्षेत्र अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संपर्क करुन आपल्या वन विभागातील वन्य प्राणी रानटी डुकरे यांनी माझ्या उभ्या होणाऱ्या पिकाची नासाडी केल्याने माझे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून मला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी शामसुंदर रेवणवार यांनी केली आहे.
तालुक्यातील शेतकरी अजूनही संकटाच्या बाहेर निघालेला नाही. मागील तीन वर्षात बँकांकडून सहकारी सोसायट्या कडून घेतलेल्या पीक कर्जाचा दर वर्षी नियमित भरणा केलेला असून ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफी शासनाकडून दील्यागेली नाही अशा शेतकऱ्यांना ५० हजाराचे सानुग्रह अनुदान देण्याचे मागील शासनाने जाहीर केले. आणि १ जुलै पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असेही सांगण्यात आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या सत्ता पालट राजकीय घडामोडी झाल्याने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान नुकतेच पदारुढ झालेल्या शासनाने रोखून धरले आहे. त्यामुळे ऐन रोवणीचा हंगाम शेतकरी कसा काय करणार या विवंचनेत सापडला आहे. यासाठी आताचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून नुकतीच झालेली नुकसान भरपाई देणार का असा प्रश्न नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.