News 34 chandrapur
चंद्रपूर - मल निस्सारण गटार एसटीपी प्लांट मध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाली असल्याची तक्रार का केली म्हणून ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.म्हाडा वसाहती साठी सुरू असलेल्या मल निस्सारण गटार एसटीपी प्लांट च्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली होती, त्याविरोधात बेले यांनी अन्नत्याग आंदोलन ही केले होते.
चौकशीचे आश्वासन मिळाल्यावर बेले यांनी आंदोलन परत घेतले मात्र तक्रारीचा राग ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडच्या कंत्राटदाराने मनात ठेवला होता. Faecal drainage scheme
21 जुलै ला सकाळी 10 वाजता प्लांट ची बाऊंडरी वॉल पडली असल्याने बेले प्लांट जवळ पोहचले.
गाडीतून न उतरता बेले हे वॉल चे फोटो काढत होते मात्र त्यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर हेमंत उचाले, सुपर व्हायजर नंदलाल पाल व राजेंद्र बेलदार हे बेले यांच्या अंगावर धावून गेले व अश्लील भाषेत बेले यांना शिवीगाळ करीत तक्रार परत घे अन्यथा तुला व तुझया परिवाराला ठार मारणार अशी धमकी बेले यांना देत सब्बल व फावडा घेऊन त्यांच्या वाहनजवळ गेले.
बेले यांच्यासोबत तिघांनी वाद घालत मारहाण केली, 24 तासाच्या आत तक्रार मागे घे अन्यथा जीवानिशी जाणार अशी धमकी ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राजेश बेले यांना दिली.
कर्मचाऱ्यांसोबत वाद न घालता बेले यांनी सरळ रामनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. Social worker attack
तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी यांना अटक करण्यासाठी म्हाडा येथे दाखल झाले असता त्याठिकाणी कुणीही आढळून आले नाही, अटकेच्या भीतीने आरोपीनी पळ काढला असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला. Corruption complent
सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे जिथे चूक होत असेल त्याठिकाणी जात भ्रष्टाचार उघडकीस करण्याचे काम करण्यात येते मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कट कारस्थान रचून असे प्रयत्न केले जाते, मल निस्सारण कामात भ्रष्टाचार झाला आहे , त्याबाबत आता अहवाल येणार असून ती तक्रार परत घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र तो फसला, यापुढे ही लढाई सुरू राहणार आहे अशी माहिती राजेश बेले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.