चंद्रपूर - महाराष्ट्र राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखू बंदी ला 10 वर्षे पूर्ण झाली असून सुद्धा राज्यात कुठेही सुगंधित तंबाखू व गुटखा सहजपणे उपलब्ध होतो.
तोंडाच्या कॅन्सर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2012 ला राज्यात गुटखाबंदी चा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतरही आज संपूर्ण चित्र बदलले आहे, बंदी असणारा हा तंबाखूजन्य पदार्थ कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होत आहे.
Gutkha ban
Gutkha ban
गुटखा व सुगंधित तंबाखू बंद झाल्यावर परराज्यातून मोठ्या प्रमाणात या पदार्थांची तस्करी आजही सुरूच आहे, परराज्यात हे पदार्थ प्रतिबंधित नसल्याने त्या ठिकाणाहून सर्रासपणे आपल्याकडे आणल्या जाते.
अनेकांवर कारवाई सुद्धा होते मात्र त्याची विक्री काही थांबत नाही.
चंद्रपूर जिल्ह्याची विदारक परिस्थिती आहे, कोरोना काळात तंबाखू जन्य पदार्थांची तस्करी थांबली मात्र जिल्ह्यातील विक्रेत्यांनी चंद्रपुरातचं सुगंधित तंबाखू बनविण्याचा कारखाना थाटला. Prohibited flavored tobacco
राज्यात बंदी असलेला पण परराज्यात उत्पादीत होणारा गुटखा, सुंगधीत तंबाखू आदी पदार्थ पोलिस पकडतात. तरीही शहरासह जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध होतो. पोलिसांच्या हाती लागणारा गुटखा सापडतो. तो विकणाऱ्यांवर कारवाईपण होते, मात्र त्याची विक्री तरीही थांबत नाही, असेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे.
Vimal gutkha
तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक असतात. यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे जीवही जातो. या पार्श्वभूमीवर राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. दुर्देवाने इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने तेथून तस्करी करून हा माल राज्यात येतो.
तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक असतात. यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे जीवही जातो. या पार्श्वभूमीवर राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. दुर्देवाने इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने तेथून तस्करी करून हा माल राज्यात येतो.
चंद्रपुरात आजही सुगंधित तंबाखू चे तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे, त्यांच्यावर कारवाई होते पण त्यांनतर चित्र जैसे थे चं. Kharra
जिल्ह्यातील अन्न व औषध विभाग हे फक्त नावापुरतेच आहे, अनेक ठिकाणी लहान मोठे तस्करांनी कारखाने थाटले मात्र त्याचा पत्ता अन्न व औषध प्रशासन विभागाला माहीत नाही.
सरकार बदलते, नवे जनप्रतिनिधी येतात आवडीचे मंत्रालय न मिळाल्याने जनप्रतिनिधी यांना राग येतो, मात्र मंत्रालय मिळाल्यावर सुद्धा त्यांच्या प्रगती पुस्तकावर प्रगती दिसत नाही, असेच या अन्न व औषध विभागाचे काम आहे, सदर कार्यालयाच्या परिसरात अनेक ठिकाणी सुगंधित तंबाखू युक्त खर्रा, गुटखा सर्रासपणे उपलब्ध होतो. FDA department
तंबाखूजन्य पदार्थावर अनेक कायदे ही बनले आहे त्यामध्ये एक कायदा "कोटपा" नावाचा याचा उपयोग आपल्या जिल्ह्यात कधी केला असेल याची अजूनही सविस्तर माहिती विभागाने दिलेली नाही.
कायदे येतात बनतात मात्र प्रभावी अंमलबजावणी यावर होत नाही, कुठेतरी मानवी शरीरावर आघात करणाऱ्या या पदार्थावर कायम बंदी करावी असे चित्र तरी सध्या दिसत नाही.