News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - मागील तीन वर्षांपासून या - ना त्या का सततच्या नापीकी पणामुळे नांदगाव येथील युवा शेतकरी यांनी आत्महत्या केल्याची घटना २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता घडली. Farmer suicide
मुल तालुक्यातील नांदगाव येथील युवक शेतकरी सदाशिव प्रकाश भंडारे वय (२९) हा युवक आपला आजोबा मनोहर रघुजी भंडारे नांदगाव यांची शेती त्यांचा नातू सदाशिव प्रकाश भंडारे हा करीत होता. त्याचेवर सहकारी सोसायटी किंवा बँकेचे कर्ज नसल्याचे समजले. यावर्षी खरीप पिकात त्यांनी शेतात धान आणि कापूस पिकाची लागवड केली. मात्र मागील पंधरवड्यात सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे तीनदा पऱ्हाटीची लागवड करूनही काहीही फायदा झाला नाही. पूर्ण पेरण्या वाया गेल्याने तो आर्थिक विवंचनेत वावरत होता असे समजले. असे असताना २२ रोजी सकाळी ८ वाजता शेतकरी जगदीश मोहुरले यांच्या शेतात असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या करुन स्वतःचे जीवन संपविले. त्याचे मागे मोठा परिवार असल्याने त्याच्या परिवाराला आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी नांदगाव उपसरपंच सागर देऊरवार यांनी केली आहे.