News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी पावसाचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाही आहे.अश्यातंच मुसळधार पावसाने धोक्याची पातळी उलांडली असून चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. Erai dam chandrapur
जिल्ह्यातील सर्वात मोठे इरई धरणाचे संपूर्ण 7 दरवाजे 1.0m ने उघडले असून त्यामधून एकूण 517 cum/sec पाण्याचा विसर्ग होणार आहे.
नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध होत, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जारी केलेल्या क्रमांकावर सम्पर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील या भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Disasters
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी ते राजुरा मार्ग बंद झालेला आहे. पुलावरून 2 फूट पाणी वाहत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील मोजा माना ते चारवट हडस्ती मार्ग ईरइ नदीला आलेल्या पुरामुळे आज सकाळ पासून बंद झाला.
Rain affected people
तोहगाव ते लाठी दरम्यान वेजगांव नाल्याला आलेल्या पुरामुळे मार्ग बंद आहे.
सोईत वर्धा नदी वरून पण्याची पातळी वाहाल्या मुळे पुलावरून पाणी वाहत असून सकाळी आज वाहतूक बंद झाली आहे