News 34 chandrapur
चंद्रपूर - राज्यात अनेक दिवस सुरू असलेल्या राजकीय भूकंप नंतर आता वीज दरवाढीचा भूकंपाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.
आधीच महागाईचे चटके सोसत असलेल्या नागरिकांना ही दरवाढ मोठा धक्का असणार आहे.
राज्यातील नागरिकांना या दरवाढीचे चटके पुढील 5 महिने सोसावे लागणार आहे. Mseb
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) यांच्या दाव्यानुसार, गेल्या 2 वर्षांत इंधन किंमतीतीत मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे ग्राहकांकडून कंपनीने कुठलीही दरवाढ न करता ज्यादा बिल आकारले नाही. परंतू यंदा इंधन दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 5 महिने ग्राहकांकडून हा वाढीव खर्च वसूल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरवाढीचा शॉक केवळ घरगुती वापरकर्त्या ग्राहकांनाच बसेल असे नाही तर औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनाही वीजदरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे. Electricity price hike
काय आहे या दरवाढीचा हिशोब जाणून घ्या....
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे 3.3 कोटी विद्युत ग्राहक आहेत. Inflation-hit
एमएसईडीसीएल च्या म्हणण्यानुसार, घरगुती ग्राहक जर 0-100 युनिट वीज वापर करतील तर त्यांना 65 पैसे प्रति युनिट अधिक पैसे मोजावे लागतील.
तर 101-300 युनिट विद्युत वापर करणा-या ग्राहकाला 1 रुपया 45 पैसे प्रति युनिट जास्त मोजावे लागतील.
301-500 युनिट विद्युत वापर असणा-या ग्राहकांच्या खिश्यावर प्रत्येक बिलात प्रति युनिट 2.05 रुपयांचा बोजा पडेल.
तर 500 युनिट पेक्षा अधिक विद्युत वापर करणा-या ग्राहकांना प्रति युनिट 1 रुपये 35 पैसे तर व्यावसायिक ग्राहकांना 2.20 रुपये प्रति युनिट अधिभार पडेल.