News 34 chandrapur
चंद्रपूर - महिला बचत गट बाबूपेठ व गंधर्व आर्ट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक पर्यावरण दिनानिमित्य सावित्रीबाई फुले शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ चंदाताई वैरागडे, गंधर्व आर्ट स्कूल चे सुरज यांचे नेतृत्वात आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी नगरसेवक हनुमान चौके, विवेकभाऊ पोतनूरवार, महेशभाऊ मायकलवार, विशाल घोरुडे, भुसारी मॅडम, मार्गदर्शक प्राचार्य नरेंद्र बोबडे विजयराव खनके शिक्षक उपस्थित होते. World environment day
यावेळी सौ चंदाताई वैरागडे यांनी प्रास्तविकेतून पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी असो किंवा कुठल्याही घरगुती कार्यक्रम असो त्यावेळी किमान एक तरी वृक्ष लावून त्याची जोपासना करावी असे आव्हाहन केले,यावेळी मार्गदर्शक प्राचार्य बोबडे सर पर्यावरणाचे संरक्षण प्रत्येकाने केली पाहिजे यासाठी सभोतालचा परिसर स्वच्छ ठेऊन जास्तीत जास्त वृक्षाचे रोपन करून त्याचे संगोपन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केली.
खनके सर यांनी प्लास्टिक मुळे पर्यावरनात किती प्रदूषण होत आहे त्यासाठी प्लास्टिक चा वापर करू नये यावर मार्गदर्शन केले. यानंतर शाळेच्या पटांगणात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी वृक्षारोपण वर आधारित स्लो गण लिहिलेले फलक घेऊन वृक्षरोपांचे महत्व पटवून देत होते, कार्यक्रमाच्या निमित्याने सर्वांना थंड पेय वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरज बिट्टे यांनी तर आभार रितिका पोहाने यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहल अंबागडे, उज्वला कार्लेकर,रेखाताई वैरागडे,वर्षा जककुलवार, राणी लेडांगे, नम्रता मोरे,संगीता वंजारी ,संगीता टवलारकर,शालिनी काळे,वंदना खेळकर, शीतल गीन्नलवार,राजकला मोहूर्ले, संगीता चिडे, वर्षा साखरकर,माधुरी नक्षीने, धर्मपुरीवार,धोपटे ताई आदींनी परिश्रम घेतले.

