News 34 chandrapur
चंद्रपूर - चांगली नोकरी मिळावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते, जर ती नोकरी शासकीय असेल तर सोने पे सुहागाचं, मात्र नोकरी लागल्यावर अधिकारी कर्मचारी गरीब व गरजू नागरिकांकडून लाचेची मागणी करतात हे मात्र योग्य नाही.
आजच्या आधुनिक युगात तर लाच ही online घेण्यात येत आहे, मात्र लाच घेतल्यावर आपण फक्त निलंबित होणार असा आत्मविश्वास अनेकांना असतो मात्र लाचेच्या एका प्रकरणात सहायक नगर रचनाकार यांना तब्बल 17 वर्षांनी न्यायालयाने 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरण चंद्रपुरातीलचं आहे. Bribe case
भद्रावती येथील परमेश ईश्वरराव शुंकपाका यांनी भद्रावती येथे कृषक प्लॉट खरेदी केला होता.
तो कृषक प्लॉट अकृषक करण्यासाठी परमेश यांनी अभिप्राय पत्र तयार करून उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या नावाने देण्याच्या कामाकरिता सहायक नगर रचनाकार देवेंद्र राघो खोत यानी 6 हजार रुपये लाचेची मागणी केली. Court verdict
पैसे देण्याची इच्छा नसल्याने परमेश यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.
प्रकरणाची पडताळणी करून तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सोनकवडे यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचून 5 नोव्हेंबर 2005 मध्ये देवेंद्र राघो खोत यांना नगर रचनाकार कार्यालय चंद्रपूर येथे 6 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
सदर प्रकरणाच्या तपासअंती तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीराम तोडासे यांनी न्यायालयात तपास पूर्ण करीत दोषारोप पत्र दाखल केले होते. Anti corruption beuro
सदर प्रकरणाचा निकाल 7 जून 2022 ला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी आरोपी देवेंद्र खोत यांना कलम 7 मध्ये 2 वर्षांची शिक्षा व 6 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याचा कारावास, 13(2) सह 13 (1) ड मध्ये 2 वर्षाची शिक्षा 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे प्रशांत घट्टूवार सरकारी वकील चंद्रपूर यांनी अत्यंत प्रामाणिक व अभ्यासपूर्वक युक्तिवाद करीत लाचखोरांना चपराक देण्याचं काम केलं आहे.
तसेच लाचलुचपत विभागाकडून राकेश ओला, पोलीस अधीक्षक, मधुकर गीते अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे व कर्मचारी अरुण हटवार यांनी काम बघितले.
उशिरा का होईना मात्र या प्रकरणात न्याय झालाच, आता लाच घेताना सदर प्रकरण लाचखोराला माहिती असणे आवश्यक आहे.
