News 34 chandrapur
चंद्रपूर - एकीकडे इरई बचाव जनआंदोलनाच्या दबावामुळे 4 एप्रिल 2022 ला इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाला पडोली रेल्वे पुलापासून पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत धूमधडक्यात शुभारंभ करण्यात आला परंतु आठ दिवसातच खोलीकरणाचे फक्त 100 फूट लांब काम केल्या नंतर थांबविण्यात आले.
डिझेल व कामगारांना खनिज विकास निधीतून निधी देण्याचे मान. उप मुख्यमंत्री अजित दादा पवार याचे आदेश असतांनाही जलसंपदा अधिकाऱ्यांना म्हणे 6 कोटी राशी हवी होती. Flooding
खोलीकारण-रुंदीकरण न झाल्या मुळे संपूर्ण नदी पात्रात हडस्ती पूल पर्यन्त मोठे गवत व बाबळीचे वन तयार झाले आहे, त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अळथळा निर्माण झाला असतांनाच चांभारकुंडी कुंडी नाला जो तुकूम प्रभागातून वाहत, वडगांव, नागीनाबाग प्रभागात रेहमत नगर पाठीमागे इरई नदीला मिळते तिथं घाण पाणी शुद्धीकरण सयंत्र (sewage treatment plant) खूप अगोदर 2010 ला उभारण्यात आला असून या चांभारकुंडी नाल्यातून घाण पाणी घेण्यासाठी तिथं नाल्यात लोखंडी दाराचा बंधारा उभारण्यात आला आहे. त्या प्लांट कडे मोठे हायवा, क्रेन, जाण्यासाठी नाल्यात पाईप टाकून वर माती टाकून रस्ता बनविण्यात आला आहे. परंतु पावसाळा 2 दिवसावर आला असतांनाही तो मातीचा रापटा काढण्यात आला नसून बंधारेचे लोखंडी गेट अजूनही नाल्यात असून त्यांना वर करण्याची गरज आहे.
याच नाल्यात ओम साई नगरी च्या बिल्डरणे 2 पाईप टाकून त्यावर मुरूम टाकून रपटा बनविला असतांना नगीनाबाग प्रभागातील लोकांनी दि 16/5/2022 ला आयुक्त,मनपा यांना 100 हुन जास्त सह्यांचे निवेदन देऊनही व नाल्याचे त्या भागाची पोकलनने सफाई केल्या नंतरही तो रपटा काढण्यात आला नसल्याने प्रशासनच चंद्रपूरकरांना पुराच्या खाईत लोटत असल्याची शंका येते. प्रत्येक वर्षी सखल भागात पूर व कधी महापूर आल्याने पूर रेषा आखल्यामुळे जनतेला घराच्या बांधकामाची व गुंठेवारीची समस्या भेडसावत असतांनाही या ज्वलंत समस्या कडे दुर्लक्ष करने नाकर्तेपणाचे लक्षण होय. हवामान खात्याने सरासरी पेक्षा अधिक पावसाची चेतावणी दिली आहे त्यात मनपा प्रशासनाचा नाकर्तेपनाचा फटका महापुराच्या रूपाने चंद्रपूरकरांना बसण्याची दाट श्यकता आहे अशी शंका इरई बचाव जनआंदोलनाचे संयोजक व वृक्षाई चे संस्थापक कुशाब कायरकर व इरई कन्या -पुत्त्रानीं व्यक्त केली.